खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड, अकोले पोलिसांची कारवाई
अकोले | Akole Crime News: अकोलेतील प्रख्यात बिल्डर व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून खंडणी (ransom) उकळल्या प्रकरणातील फरार आरोपी मयूर सुभाष कानवडे यास तब्बल १० महिन्यानंतर मोठ्या शिथापीने सापळा रचून संगमनेर येथून अकोले पोलिसानी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि प्रख्यात बिल्डर व्यावसायिक लक्ष्मीकांत उर्फ चेतन अंबादास नाईकवाडी यांच्याकडून ३० लाख रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात २ फेब्रुवारी २०२१ रोजी गणेश भागुजी कानवडे,मयूर सुभाष कानवडे व एक अश्या तिन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावेळी गणेश कानवडे यास यास अटक करुन नंतर जामिन मंजूर करण्यात आला आहे मात्र मयूर कानवडे हा पोलिसांना गुंगारा देऊन फरार होण्यात यशस्वी झाला होता. यानंतर मयूर कानवडे याचा संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याने औरंगाबाद हायकोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र औरंगाबाद हायकोर्टाने २५/०६/२०२१ रोजी मयूर कानवडेचा जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून अकोले पोलीस त्याच्या शोधात होते. त्यास तब्बल 10 महिन्यांनी 28 डिसेंबर 2021 रोजी रात्री 10.35 च्या सुमारास अकोले पोलिसांनी त्यास सापळा रचून संगमनेर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. बुधवारी मयूर कानवडे यास अकोले न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
Web Title: Akole Crime news accused of ransom crime, Akole police action