Home अहमदनगर Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉन पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू

Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉन पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू

Some restrictions apply on Omicron background in Ahmednagar

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यात शुक्रवारी श्रीरामपूर येथे ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात सध्या करोना रुग्ण संख्या ४० ते ७० या दरम्यान आढळून येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काल कोरोना रुग्णसंख्या वाढू नये या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू केले आहे.  

जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालय, खासगी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचा किमान एक डोसची सक्ती केली आहे. नो व्हॅक्सीन, नो एन्ट्रीचे असा आदेश काढण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या आदेशात जिल्ह्यात दररोज किमान 40 ते 70 नव्याने करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. दक्षिण आफ्रिका आणि अन्य काही देशातून कोविड 19 चा बी.1.1.529 हा नवीन व्हेरिएंट आढळून आलेला आहे. त्यास जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन असे नाव दिलेले आहे. या नवीन व्हेरिएंटचा प्रार्दुभाव हा अतिशय वेगाने होत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे सर्व टास्क फोर्स, तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून सुचित करण्यात आले आहे.

या विषयी सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष करून लसीकरण न झालेल्या नागरिक समूहात मिसळ्यास त्याचे स्वत:चे आरोग्य धोकेदायक ठरणार आहे. ही बाब विचारात घेवून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश दतांना त्याचे लसीकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यानूसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, खासगी आस्थापना, कार्यालये, व्यावसायिक व औद्योगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह, लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सभारंभ, मेळावे व तत्सम सर्वच सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात नो या विषयी सांगोपांग चर्चा करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत या विषयासंदर्भात नागरिकांना अधिक प्रमाणात लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी काही ठोस उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष करून लसीकरण न झालेल्या नागरिक समूहात मिसळ्यास त्याचे स्वत:चे आरोग्य धोकेदायक ठरणार आहे. ही बाब विचारात घेवून सार्वजनिक ठिकाणी अशा नागरिकांना प्रवेश दतांना त्याचे लसीकरणाची शहानिशा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच

सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात “No Vaccine No Entry” याप्रमाणे निबंध लागू करीत आहे.

2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापना यांनी त्यांचे कार्यस्थळी येणा-या नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहील. व याशिवाय प्रवेश देणे प्रतिबंधित राहील.

3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन (Covid Appropriate

Behaviour) चे तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे

बंधनकारक राहील.

4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क परिधान करणे, नाक व तोंड नेहमी मास्कने झाकलेले असले पाहिजे.

Web Title: Some restrictions apply on Omicron background in Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here