निळवंडे साठी सर्वांनी एकत्र यावे. – खा. लोखंडे
निळवंडे साठी सर्वांनी एकत्र यावे. – खा. लोखंडे
शिर्डी: एकमेकांवर टीका करण्यापेक्षा शेतकर्यांना पानी मिळवून देण्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याचे आवाहन खा. सदाशिव लोखंडे यांनी केले आहे.
येत्या 9 ऑक्टोबर ला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहेत. या बैठकीसाठी निळवंडे लाभक्षेत्रातील सर्वच प्रतींनिधींना निमंत्रित केले असल्याचे खा. लोखंडे यांनी संगितले. प्रकल्पासाठी पैशाची कोणतीही अडचण नाही मात्र कामाची गती वाढविण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी एकत्र आले तर येत्या दोन वर्षात दुष्काळ ग्रस्त भागाला नक्कीच पाणी मिळेल असे खा. लोखंडे यांनी संगितले.
You May Also Like: Yeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies
खा. लोखंडे यांनी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने ही बैठक ठेवण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज्याचे विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. बाळासाहेब थोरात, आ. वैभवराव पिचड, स्नेहलता कोल्हे, आ. शिवाजीराव कार्डिले , आ. राजाभाऊ वाजे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे केंद्राच्या बळीराजा कृषि संजीवनी योजनेच्या माध्यमातून नाबार्डचा निधि मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या संदर्भातील अहवालाही केंद्रात दाखल झाला आहे. राज्य सरकार देखील 25 टक्के वाटा उचलणार आहे. त्यामुळे आता कालव्याची कामे जलद गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन ही कामे लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याकडे लक्ष दिले पाहिजे असे मत खा. लोखंडे यांनी व्यक्त केले.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा. किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा