रिपब्लिकन पक्षाच्या अध्यक्षांना जीवे मारण्याची धमकी, हे आहे कारण
अहमदनगर | Crime News: युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र घरी पोस्टाने आले असून त्यात त्यांना आणि कुटुंबाला कुटुंबाला जीवे मारण्याची धमकीचा मसुदा आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान याप्रकरणी आ. संग्राम जगताप, अशोक गायकवाड हे सोमवारी सकाळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची भेट घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात गेले होते. अधीक्षक पाटील बाहेरगावी असल्याने त्यांची भेट होवू शकली नाही. सावेडी उपनगरातील बिशप लॉईड कॉलनीमध्ये अशोक गायकवाड राहतात. गायकवाड यांना 25 डिसेंबरच्या आत बिशप लॉईड कॉलनी सोडून जाण्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. नाहीतर त्यांच्यासह कुटुंबाला जीवे मारण्याचे धमकी देण्यात आली आहे.
Web Title: Crime News Republican president threatened with death