Corona News: मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी कोरोनाबाधित
पाथर्डी | Corona News Update: पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने याच शाळेतील पाच विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. हे सर्व विद्यार्थी पहिले ते चौथीच्या वर्गातील आहे. मुख्याध्यापकासह पाचही विद्यार्थ्यांची तब्येत ठणठणीत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव २३ डिसेंबरपर्यंत जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डमाळवाडी येथे चौथीपर्यंत प्राथमिक शाळा आहे. दोन दिवसांपूर्वी या शाळेच्या मुख्याध्यापकाने कोरोना चाचणी केली होती. ते कोरोना बाधित आढळून आल्यानंतर शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. त्यामध्ये १५ विद्यार्थी निगेटिव्ह आले तर पाच विद्यार्थी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या कारणास्तव २३ डिसेंबरपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
Web Title: Corona News Update head master and five student Corona Positive