संगमनेर पोलिसांच्या ताब्यातील वाळूच्या ट्रॅक्टरची चोरी
संगमनेर | Theft: आठ दिवसांपूर्वी जप्त करून पोलीस वसाहतीत लावलेला वाळूचा ट्रॅक्टर ट्रोलीसह चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वाळू तस्कर वाहन परस्पर घेऊन जातात अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, ३ डिसेंबर रोजी प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसून त्याची वाहतूक करताना एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर एम.एच. १७ बी. एक्स. १३८५ ट्रोलीसह व त्यात एक ब्रास वाळू आढळून आल्याने महसूल विभागाने जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल करून तो पोलीस वसाहतीत लावण्यात आला होता. दरम्यान दोन दिवसांपूर्वी अज्ञात इसमांनी हा ट्रॅक्टर तेथून चोरून नेला. याप्रकरणी तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल टोपले हे करीत आहे.
दरम्यान पोलिसांच्या वसाहतीत लावलेला ट्रॅक्टर वाळू तस्कर पळवून घेऊन जात असतील तर पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर नागरिक शंका उपस्थित करीत आहे. पोलिसांचा वाळू तस्करांवर धाक राहिलेला नाही असे चित्र दिसून येत आहे.
Web Title: Theft of sand tractor in the possession of Sangamner police