धक्कादायक: क्रिकेट स्पर्धा सुरु असताना खेळाडूच्या छातीत दुखू लागले अन
अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात क्रिकेट स्पर्धा सुरू असताना खेळाडूला हृदयविकाराच्या झटका (heart attack) आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी सायंकाळी ५ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यासह सर्व क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
लोकेश अर्जुन ढोबळे (वय २७, राहाणार गजानन नगर, कोपरगाव) असे मयत (Dead) झालेल्या तरुण खेळाडूचे नाव आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात साई सिटी मैदानावर क्रिकेट स्पर्धा सुरू असून गुरुवारी ९ डिसेंबर रोजी क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजी करून पवेलीयनमध्ये परतलेल्या खेळाडूला अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला सहकारी खेळाडूंनी प्रथम जवळच्या खाजगी रुग्णालयात व नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले.
Web Title: Ahmednagar Kopargaon player died of a heart attack