Theft: राहत्या घरात दरोडा: लाखो रुपयांचा ऐवज लंपास
नेवासा Theft: नेवासा तालुक्यातील बहिरवाडी येथे पोपट गोरक्षनाथ शिसोदे यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली रात्री तीन वाजेच्या सुमारास घडली आहे.
या दरोड्यात १ लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला असून कुटुंबातील सदस्यांना मारहाण करण्यात आली आहे.
घटनास्थळी शेवगाव उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे व नेवासा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट दिली आहे व तपास पथके रवाना झाली आहेत. तसेच नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Web Title: Living house robbery theft worth lakhs of rupees