संगमनेर तालुक्यात महामार्गावर आयशर व दोन कारचा विचित्र अपघात
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर आंबी खालसा फाटा येथे आयशर चालकाला गर्तीरोधकाचा अंदाज न आल्याने चालकाचा आयशरवरील ताबा सुटल्याने अपघात घडला. शनिवारी सायंकाळी साडे सात वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात दोन कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या अपघात जीवितहानी झाली नाही.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथून पुणे जिल्ह्यात चाकण येथे एका कंपनीचे साहित्य घेऊन पुण्याकडे जाणारा आयशर(क्रमांक एमएच. ०४ डी.एस. ३२९८) संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे आला असता चालकाला गतीरोधाकाचा अंदाज न आल्याने आयशर पुढे चाललेल्या कारला (क्रमांक एम.एच. १२ एस,ई. ६३५२) पाठीमागून धडकला या धडकेत कार दुसऱ्या लेनवर जाऊन थांबली. त्याचवेळी पुढे चाललेल्या कारला (एमएच ०४ सी.एम. २६०६) आयशर उजव्या बाजूने घासून गेल्याने कार चालकाने आयशरला अडविण्याच्या अयशराची कारला मागून धडक बसली. या विचित्र अपघातात दोन्ही कारचे मोठे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी हा विचित्र अपघात घडला.
Web Title: Sangamner Bizarre accident of Eicher and two cars on the highway