Home महाराष्ट्र भारतासाठी धक्कादायक: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच, दोन रुग्ण आढळले

भारतासाठी धक्कादायक: ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केलाच, दोन रुग्ण आढळले

Corona new Variant Omicron entered India

नवी दिल्ली | Corona new Variant Omicron entered India: ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी भारत सरकारने युद्धपातळीवर पावले टाकले. आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांबाबत कठोर धोरण राबवले. मात्र, त्यानंतरही ओमिक्रॉनने भारतात शिरकाव केला असून ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आज आढळून आले आहेत. हे दोन्ही रुग्ण कर्नाटकमध्ये आढळले असून याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून माहिती देण्यात आली आहे.

करोना संसर्गाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा फैलाव वेगाने होत असल्याने जगभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ही बाब लक्षात घेत विदेशातून आणि त्यातही ओमिक्रॉनसाठी हाय रिस्क म्हणून जाहीर करण्यात आलेल्या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांसाठी नियम कठोर करण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी सक्तीची करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ही खबरदारी घेतली जात असतानाही भारतात ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले असून दोघेही कर्नाटकातील असल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी दिली. ‘गेल्या २४ तासांत भारतात ओमिक्रॉनचे व्हेरिएंटची लागण झालेले दोन रुग आढळले आहेत. यातील एका व्यक्तीचे वय ६६ वर्षे आहे तर दुसरी व्यक्ती ४६ वर्षांची आहे’, असेही अगरवाल यांनी नमूद केले.

Web Title: Corona new Variant Omicron entered India

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here