Home महाराष्ट्र कॉंग्रेसला आघात: कॉंग्रेसच्या आमदाराचे निधन

कॉंग्रेसला आघात: कॉंग्रेसच्या आमदाराचे निधन

Kolhapur Death of a Congress MLA Chandrakant Jadhav

कोल्हापूर:  कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार चंद्रकांत जाधव यांचे मध्यरात्री दोन वाजता दुःखद निधन झाले.  (Death of a Congress MLA Chandrakant Jadhav) त्यांचे वय ५९ वर्ष होते.  हैदराबाद येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.

गेल्या वर्षी जाधव यांना करोनाची लागण  झाली होती. तेव्हापासून त्यांची प्रकृती खालावत गेली होती. तरीही शहराच्या प्रत्येक प्रश्नात ते लक्ष घालत होते. प्रकृतीकडे दुर्लक्ष करून अनेक कामांमध्ये हिरीरीने सहभागी होत होते. पाच दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळं त्यांना हैदराबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या अन्ननलिकेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण याच वेळी त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने  तो शेवटपर्यंत नियंत्रणात आला नाही. अखेर काल मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

Web Title: Kolhapur Death of a Congress MLA Chandrakant Jadhav

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here