Home अहमदनगर कॉलेजला विद्यार्थ्याकडून लाच घेताना लिपिकास अटक

कॉलेजला विद्यार्थ्याकडून लाच घेताना लिपिकास अटक

Ahmednagar Clerk arrested for taking bribe from college student

अहमदनगर | Bribe Case: अनेक कालावधीच्या प्रतीक्षेनंतर अखेर शाळा कॉलेज सुरु झाले आहे. कोरोनामुळे अगोदरच शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला असताना नगर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एकता कॉलेज ऑफ सायन्स अ‍ॅण्ड कॉमर्समधील लिपिकाला तिसऱ्या वर्षात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याकडून शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे.

असद युसुफ खान पठाण (वय 42 रा. मुकुंदनगर) असे पकडलेल्या लिपिकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी कि,  तक्रारदार विद्यार्थी एकता कॉलेज येथे सायन्स द्वितीय वर्षात शिक्षण घेत होते. त्यांना तृतीय वर्ष रसायनशास्त्र या विषयाकरिता प्रवेश घेण्यासाठी लिपिक पठाण याने प्रवेश शुल्का व्यतिरिक्त पाच हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदार यांनी बाबतची तक्रार लाचलुचपत विभागाकडे केली.

त्यावरून एकता कॉलेज येथे पथकाने लाच मागणीची पडताळणी केली. पठाण याने पंचासमक्ष तक्रारदाराकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. तपोवन रोडवरील एका हॉटेल समोर लाचलुचपतच्या नगर पथकाने कारवाई करत असद युसुफ खान पठाण याला पकडले.

Web Title: Ahmednagar Clerk arrested for taking bribe from college student

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here