Home Suicide News संगमनेर तालुक्यात राहत्या घरात साडीने गळफास घेत एकाची आत्महत्या

संगमनेर तालुक्यात राहत्या घरात साडीने गळफास घेत एकाची आत्महत्या

Sangamner One commits suicide by hanging himself with a sari

संगमनेर | Suicide: तालुक्यातील तळेगाव दिघे येथे राहत्या घरात साडीने गळफास घेत एकाने  आत्महत्या  केल्याची घटना घडली आहे.  मोहन हिरामण अर्ने वय ३८ असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तळेगाव दिघे येथे मोहन हिरामण अर्ने हे राहत होते. दुपारी घराच्या छताच्या लोखंडी अंगलला साडीच्या सहायाने गळफास घेत जीवन संपविले. त्यांची पत्नी कामासाठी बाहेर गेली होती. ती दुपारी घरीं आल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. गळफास घेतलेल्या स्थितीत मोहन यांचा मृतदेह आढळून आला. पोलीस पाटील यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल लक्षमण औटी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन मृतदेह खाली घेण्यात आला. आणि मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. याप्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जबाबानुसार संगमनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग अपडेट वाचण्यासाठी  संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Sangamner One commits suicide by hanging himself with a sari

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here