प्रांतधिकारी यांना शिवीगाळ करणारा तो पोलीस कर्मचारी निलंबित
कर्जत | Crime News: कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना अवैध वाळू वाहतूक करताना शिवीगाळ करणारा व वाळूचा ट्रक पळवून नेण्यास मदत करणारा पोलीस कर्मचारी केशव व्हरकुटे यास निलंबित करण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास महसूल विभागाच्या पथकाकडून कर्जतच्या बालाजी मंदिर येथे कारवाई सुरु असताना शिवीगाळ करत वाळूचा ट्रक पळवून नेण्यास मदत केली होती.
त्याबाबतचा अहवाल पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना पोलीस निरीक्षक यांनी दिला होता. त्या अहवालावर कार्यवाही करत करण्यात आली असून पोलीस कर्मचारी व्हरकटे याला शुक्रवारी रात्रीच निलंबित करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही माहिती दिली आहे. केशव व्हरकटे याच्याविरुद्ध कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला अॅप येथून अपडेट करा. संगमनेर अकोले न्यूज
Web Title: Crime News police officer who insulted the governor was suspended