Home अकोले तीन कृषी कायदे रद्द, आता किसान सभेने केली ही मागणी

तीन कृषी कायदे रद्द, आता किसान सभेने केली ही मागणी

Three agricultural laws repealed, now demanded by Kisan Sabha

अहमदनगर | Ahmednagar: अहमदनगरः केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. त्यामुळे देशभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. यावर भारतीय किसान सभा या शेतकरी संघटनेनेही पहिली प्रतिक्रिया मांडली आहे. ‘हे कायदे रद्द करण्यासाठी वर्षभरापासून नेटाने लढलेल्या शेतकऱ्यांना सलाम. आता केंद्र सरकारने पिकांना आधारभावाचे संरक्षण देणारा कायदा करावा,’ अशी मागणी किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर यासंबंधी प्रतिक्रिया देताना डॉ. नवले म्हणाले,  संबंध वर्षभर देशातील पाचशेपेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी जो संघर्ष केला, त्या संघर्षाचा हा विजय आहे. या संघर्षात ६०० पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या शहिदांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे स्मरण या निमित्ताने होत आहे. यासोबतच जे लाखो शेतकरी दिल्लीच्या सिमांवर नेटाने लढले त्यांनाही आमचा सलाम,’ असं नवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाचे: संगमनेर अकोले न्यूज नवीन सुपर फास्ट स्वरूपात आजच आपला  अॅप येथून अपडेट करा.   संगमनेर अकोले न्यूज 

Web Title: Three agricultural laws repealed, now demanded by Kisan Sabha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here