Home क्राईम वेल्हाळे शिवारात बेकायदा दारू वाहतून करणारा कंटेनर पकडला

वेल्हाळे शिवारात बेकायदा दारू वाहतून करणारा कंटेनर पकडला

Sangamner Velhale Shivara, a container carrying illegal liquor was caught

संगमनेर | Sangamner: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वेल्हाळे शिवारात बेकायदा दारू वाहतूक  करणारा कंटेनर पकडला.याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल ७० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

वेल्हाळे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे येथील भरारी पथकाने बेकायदा दारू वाहतूक  करणारा कंटेनर पकडला. या कारवाईत ६९ लाख १३ हजार 300 रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. आयशर कंपनीचा सहा चाकी कंटेनर जप्त करण्यात आला आहे. कंटेनरचा चालक सूर्यकुमार रामचंद्र शिरसाट (वय 35, रा.विलेपार्ले मुंबई याला ताब्यात घेण्यात आले आहे.  यावेळी संगमनेर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून शुक्रवारी माहिती देण्यात आली. 

याबाबत पुणे विभागाला गुप्त खबर्याकडून माहिती मिळाली असल्याने या पथकाने पथकाने मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे शिवारात अडविला. कंटेनरचची झडती घेतली असता दारू बॉटलचे बॉक्स आढळून आले. 

Web Title: Sangamner Velhale Shivara, a container carrying illegal liquor was caught

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here