Home अकोले Crime News: अकोले तालुक्यात घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Crime News: अकोले तालुक्यात घरफोडी करणारा आरोपी जेरबंद

Crime News Accused of burglary arrested in Akole taluka Theft

राजूर | Crime News | Theft : अकोले तालुक्यातील तेरुंगण गावात अज्ञात आरोपीने घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार घडला होता, याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कई, दि 10/11/2021रोजी 09. O0 ते रात्रीचे 08.00 च्या दरम्यान तेरुगंण गावात राहणारे बाळु भागा चौधरी यांच्या राहत्या घरात अज्ञात आरोपीने घराचा दरवाजा उघडुन त्यांच्या घरातील मातीच्या कोठीत ठेवलेले खालील वर्णनाचे सोन्याचे व चांदीचे दागिने चोरुन नेले होते. 22.000/-रु किंमतीच्या अर्धा अर्धा तोळ्याच्या दोन नथी जु.वा.कि.अं 33.000/- रु. किंमतीच्या दिड तोळा वजनाच्या चार पुतळ्या व एक पान जु.वा.किं.अं 10.000/- रु किंमतीच्या अर्धा किलो वजनाचे चांदीचे एळा जु.वा. कि.अं एकुण-65.000/- रुपये. त्यानुसार बाळु भागा चौधरी याने दिलेल्या फिर्यादी वरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 189/2021 भा.द.वि. कलम 380,454,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हाचा तपास करत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, सदरची घरफोडी मारुती रामा कातडे, (वय 25 वर्ष), रा.तेरुगंण ता. अकोले याने केली आहे. त्यानुसार मारुती रामा कातडे यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्यांने सदर घरफोडी केल्याची कबुली दिली असुन वरील वर्णनाचा चोरीस गेलेले 2.5 तोळे सोन्याचे दागिने व 500 ग्रॅम चांदीचे दागिने असा एकुण 65,000/- रुपये किंमतीचा मुददेमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला.

मा. मनोज पाटील, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती दिपाली काळे मॅडम, अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर मा.श्री राहुल मदने उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक, नरेद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार पो. हा / 2042 भांगरे, पो. ना.देवीदास भडकवाड, पो कॉ अशोक गाढे, पोकॉ/प्रविण थोरात यांनी ही कारवाई केली असुन गुन्हाचा अधिक तपास तपास पो.ना भडकवाड करीत आहेत.

Web Title: Crime News Accused of burglary arrested in Akole taluka Theft

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here