अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आयसीयु वार्डला आग, १० जणांचा मृत्यू
अहमदनगर | Ahmednagar Hospital Fire: अहमदनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु वार्डला आज सकाळी १० वाजेच्या सुमारास आग लागल्याने या आगीत १० जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ५० ते ८५ या वयोगटातील व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समजते.
या वार्डला आज सकाळी आग लागून सर्व जण गंभीर भाजले. या वार्डमध्ये कोरोनाची लागण असलेल्या २५ जणांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली आहे. या आगीत सात जण गंभीर जखमी झाले असून २० जणांना तातडीने इतर कक्षांत हलविण्यात आले आहे.
पालकमंत्री हसन मुश्रीफ व महसूलमंत्री थोरात आज जिल्हा रुग्णालयाला भेट देणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे रविवारी नगरमध्ये येऊन आढावा घेणार आहेत. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. हलगर्जीपणा करणाऱ्या जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. या आगीत १० जणांचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
Web Title: Ahmednagar Hospital Fire