विनयभंगाचा गुन्हा मागे घेण्यासाठी महिलेस बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न
अहमदनगर | Ahmednagar: विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेला मागे घेण्यासाठी तरूणाने नोकरदार महिलेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास भिंगार पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगेश रामचंद्र घायतडक वय 39 रा. माधवबाग, बालाजी कॉलनी, भिंगार असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दोन वर्षांपूर्वी फिर्यादी यांनी घायतडक याच्याविरोधात विनयभंगाचा (molestation)गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री घायतडक हा त्याच्याकडील दुचाकीवरून बंदुक घेऊन फिर्यादीच्या घरी गेला. घरासमोर फिर्यादीच्या दिशेने बंदुक धरून, तू माझ्याविरूद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घे, नाही तर तुला व तुझ्या नवर्याला सोडणार नाही, असे म्हणत फिर्यादीला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पोलिसांनी आरोपी घायतडक यास अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहे.
Web Title: Attempt to kill a woman at gunpoint to withdraw the charge of molestation