राजूर कुस्ती सेंटरच्या पै आकाश माळवे याची अकोले तालुक्यातून जिल्हास्तरीय महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड
अँड.एम.एन.देशमुख महाविद्यालयात अकोले तालुका महाराष्ट्र केसरी साठी निवड चाचणी संपन्न
राजूर | Akole : रविवार दिनांक २४ आक्टो.२०२१ रोजी राजूर येथील एम.एन.देशमुख महाविद्यालयातील साई कुस्ती सेंटर येथे ६१वी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढत स्पर्धेसाठी साठी अकोले तालुका निवड चाचणी संपन्न झाली. यासाठी अकोले तालुक्यातून एकूण १० कुस्ती पैलवान निवड चाचणीसाठी उपस्थित होते. अशी माहिती साई कुस्ती आखाडा चे प्रशिक्षक श्री.नरके सर व बबलू शेठ धुमाळ ( अध्यक्ष अकोले तालुका तालीम संघ) यांनी दिली.
या अकोले तालुका निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. वाय.देशमुख यांचे हस्ते श्रीफळ फोडून झाले. “जिद्द आणि महत्त्वाकांक्षा तसेच सकारात्मक विचार या बळावर निश्चितच यश मिळविता येते. अपयश जो पचवितो तोच यशाचे शिखर गाठतो.” असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले .चाचणीत निवड झालेल्या अँड .एम. एन देशमुख कुस्ती सेंटर मधील पैलवान आकाश माळवे व इतर सर्व पैलवान स्पर्धकांना जिल्हा पातळीवरील निवडीसाठी प्राचार्य देशमुख यांनी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र केसरी जिल्हा निवड चाचणी ही दि.३१ ऑक्टो.२०२१ रोजी श्रीगोंदा पारगाव या ठिकाणी होणार आहे. ही तालुकास्तरीय स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अँड .एम एन. देशमुख साई कुस्ती सेंटर चे कोच आंतरराष्ट्रीय पदक विजेते श्री तानाजी नरके यांचे विषेश सहकार्य लाभले , या निवड चाचणीसाठी श्री विकास नवले सर,श्री बनकर सर ,सावंत सर, विशाल पवार सर इत्यादी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची आभार प्रदर्शन श्री नरके सर यांनी केले.
Web Title: Akash Malave Selection test for Akole taluka Maharashtra Kesari