Crime News: शेतीच्या बांधावरून महिलेचा विनयभंग व मारहाण

राहुरी |Crime News| Rahuri: राहुरी शहरातील हद्दीत शेतीच्या बांधावर इलेक्ट्रीक खांब रोवण्याच्या कारणावरून आरोपीने एका 30 वर्षीय महिलेला मारहाण करून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी पोलीस ठाण्यात एका ३० वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून एक 30 वर्षीय महिला राहुरी नगरपरिषद हद्दीत राहत आहे. दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला व तिचे नातेवाईक शेतीच्या सामाईक बांधावर चालू असलेले इलेक्ट्रीक खांब रोवण्याचे काम पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले व फिर्यादीस म्हणाले, तुम्ही बांधावर खांब का रोवता? असे म्हणाले असता फिर्यादी हे आरोपीला म्हणाले, आम्ही बांधापासून दोन फूट अंतर सोडून खांब रोवत आहोत.
असे म्हटल्याचं आरोपीला राग आल्याने त्याने फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून फिर्यादीचे पती यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादी व फिर्यादीची जाव त्यांचे भांडणे सोडविण्यासाठी गेले असता आरोपीने फिर्यादीचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज
आरोपी कोंडिराम मंजाबापू गुलदगड रा. तनपुरेवाडी रोड, राहुरी याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Rahuri Crime News molestale and beating of a woman on a farm dam















































