Home क्राईम संगमनेर: महिलेच्या गुप्तांगावर चटके, विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

संगमनेर: महिलेच्या गुप्तांगावर चटके, विषारी औषध देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

Crime News Trying to kill a woman by clicking on her genitals 

संगमनेर| Crime News: एका 19 वर्षीय तरुणीला घरात कोंडून तिच्या गुप्त अंगावर चक्क उलाथनीने चटके दिल्याचा संगमनेर शहरात प्रकार अकोले नाका परिसरात घडला आहे.

याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दोन महिलांसह एक पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दोन महिलांना अटक केली असून एक पुरुष फरार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित मुलगी ही एका कापड दुकानात काम करीत होती. तेव्हा तिची ओळख एका तरुणाशी झाली होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेम होऊन शरिर संबंध झाले आणि ती त्यातून गरोदर राहिली होती. दोघांनी लग्न करायचे ठरविले मात्र, हा प्रकार मुलाच्या घरच्यांना मान्य नव्हता. यात मुलाचे वय २१  वर्षे नसल्याने तो वयात येताच लग्न करुन देण्याचे लेखी घेण्यात आले होते.

तेव्हापासून पीडित मुलगी ही तिच्या घराच्यांसोबतच राहत होती. या दरम्यान मंगळवारी ती चिकन आणण्यासाठी अकोले नाका येथे गेली असता तिला मुलाकडील एक व्यक्ती भेटला आणि तुझी कागदपत्रे द्यायची म्हणून तिला सोबत घेउन गेला. घरात गेल्यानंतर तेथे २ महिला घरातच बसलेल्या होते.

पीडित मुलगी घरात गेली असता महिलांनी घराला आतमधून कडी लावली. त्यावेळी दोन्ही महिलांनी पीडित तरुणीस खाली पाडले व म्हणल्या की, आम्ही आता तुला जिवंत सोडणार नाही. तु आमच्या मुलाची जिंदगी बरबाद केली आहे. असे म्हणत आरोपी महिलांनी स्वयंपाक घरातील उलाथनी गॅसवर तापवून तिच्या गुप्तांगावर चटके दिले.

तसेच आरोपी महिलांनी त्यांच्या घरातील विषारी औषधाची बाटली फोडून एक महिलेने पीडित तरुणीच्या तोंडात बोट घालुन औषध तोंडात ओतण्याचा प्रयत्न केला.

सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अधिक तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे.

Web Title: Crime News Trying to kill a woman by clicking on her genitals 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here