Bribe: लाच घेताना दोन खासगी एजंटाना अटक
राहुरी | Bribe: अधिकाऱ्याच्या नावाखाली १ लाख रुपयांची मागणी करून त्यातील ४० हजार रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या राहुरी येथील रजिस्टर कार्यालयातील दोन खासगी एजंटना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केलीआ आहे. राहुरी येथील स्टेशन रोडवरील एका हॉटेलमध्ये कारवाई करण्यात आली.
हबीब बाबुभाई सय्यद वय ५२ व शकील अब्बास पठान वय ४२ रा. दोघेही सडे रा. राहुरी असे अटक केलेल्या एजंटाची नावे आहेत.
राहता तालुक्यातील दाढ बुद्रुक येथील तक्रारदराने नगर येथील जातपडताळणी कार्यालयात दावा दाखल केला होता की, तीन व्यक्तीने खोटे जातीचे दाखले काढून जातपडताळणीसाठी अर्ज केला आहे. त्यांना जातपडताळणी प्रमाणपत्र देऊ नये असा सदर व्यक्तीचा दावा होता. या दाव्याच्या बाजूने निकाल देण्यासाठी अधिकाऱ्याला एक लाख रुपये द्यावे लागतील असे सांगून सय्यद आणि पठान यांनी तक्रारदाराकडे ८० हजाराची रक्कम मागितली. १५ ऑक्टोबर रोजी त्यातील ४० हजार रुपये स्वीकारताना पथकाने सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS
Web Title: Two private agents arrested for taking bribe