Home अहिल्यानगर Murder धक्कादायक: हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ करत खून

Murder धक्कादायक: हुंडा न दिल्याने विवाहितेचा छळ करत खून

Murder by torturing a married woman for not giving her a dowry

अहमदनगर | Murder: लग्नाच्या वेळी ठरलेले पाच लाख रुपये न दिल्याने सासरच्यांनी विवाहितेचा छळ करीत तिला गळफास देऊन खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अरणगाव येथे घडली आहे.

योगिता निलेश दळवी असे वय २२ रा. अरणगाव असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पाच जणांवर नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मयत योगीताचे वडील देवराम आसाराम गव्हाणे वय २५ रा. वडगाव गुप्ता यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

योगिताचा पती नीलेश बाळासाहेब दळवी, सासू आशा बाळासाहेब दळवी, सासरा बाळासाहेब रामभाऊ दळवी, भाया पप्पु बाळासाहेब दळवी, जाव मेघा पप्पु दळवी (सर्व रा. अरणगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

गव्हाणे यांच्या मुलीचे नीलेश दळवी याच्यासोबत लग्न झाले होते. लग्नावेळी सासरच्यांनी ५ लाख रूपये हुंडा मागितलेला होता. हुंडा न दिल्याने सासरच्या लोकांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला योगिताने फोन करून माहेरच्या लोकांना हा प्रकार कळविला होता.  योगिता तिच्या घरी असताना आरोपींनी तिला गळफास देवुन जीवे ठार मारले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास तपास पोलीस उपनिरीक्षक जारवाल करीत आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील नियमितपणे बातम्या वाचण्यासाठी आजच आमचा अॅप डाऊनलोड करा:- SANGAMNER AKOLE NEWS

Web Title: Murder by torturing a married woman for not giving her a dowry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here