अकोले | Adhala Dam: अकोले, संगमनेर, सिन्नर तालुक्यातील 16 गावांचे भवितव्य असणा-या आढळा धरणाने पूर्णक्षमतेन पाणीसाठा पार केला आहे. यंदा चिंता वाढवली होती मात्र रडतखडत आढळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
1060 दलघफू पाणीसाठा क्षमतेचे देवठाणचे आढळा धरण शुक्रवारी पहाटे 4 वाजता पुर्ण भरले आणि सांडव्यावरुन पाणी आढळा नदीत झेपावले. धरण पुर्ण क्षमतेने भरल्यानंतर सांडव्यावरुन 10 क्युसेक्सने पाणी नदीपात्रात वाहू लागले.
संगमनेर, अकोले, सिन्नर तालुक्यातील 16 गावांच्या 3914 हेक्टर क्षेत्रातील लाभक्षेत्रात आढळा धरण पुर्णत्वाने भरल्याने आनंदी वातावरण निर्माण झाले आहे.
जर पाऊस झाला नाही तर नदीपात्र आणि कालव्यांमधून अतिरीक्त पाणी लाभक्षेत्रात जाणार नाही. परिणामी भुजलस्तर धरण भरुनही खालावतच जाईल.
Web Title: Adhala Dam Overflow