संगमनेर तालुक्यात पुलावरून पलट्या घेत मालवाहू कंटेनर पुलाखाली उलटला
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावरील बाजार तळानजीक असलेल्या धोकादायक अपघाती वळण रस्त्यावरील अरुंद पुलावरून दोन पलट्या खात मालवाहू कंटेनर थेट ओढ्यात उलटून अपघात घडला.
हा अपघात गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर झाला. या अपघातात चालक मधुकर कांबळे हवे किरकोळ जखमी झाले असून अपघातांचा सिलसिला सुरुच आहे, बाजार तळानजीकच्या अपघाती वळण रस्त्याचे व अपघाती अरुंद पुलाचे त्वरित रुंदीकरण करावे, अशी मागणी छत्रपती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष सचिन दिघे व बी. सी. दिघे यांनी केली आहे.
लोणी ते नांदूरशिंगोटे या तळेगाव दिघेमार्गे असलेल्या डांबरी रस्त्याने चालक मधुकर कांबळे हे मालवाहू कंटेनरमध्ये ( टीएस १५ युए ००४५ ) पेपर घेवून बिदर (कर्नाटक) येथून सिल्वासाच्या (गुजरात) दिशेने प्रवास करीत होते. भरधाव वेगाने जाणारा कंटेनर तळेगाव दिघे बाजार तळानजीकच्या अरुंद पुलावरून तीन पलट्या खात उलटून ओढ्यात अपघातग्रस्त झाला. या अपघाताच्या वेळी अन्य वाहन नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
नजीकच सुनील दिघे यांचे साईश एजन्सी हे इलेक्ट्रानिक दुकान आहे. सदर दुकानाच्या गोडावूनसमोर लावलेल्या सीसीटीव्हीत अपघाताच्या घटनेचे चित्रिकरण झाले. या अपघातात मालवाहू कंटेनरचे मोठे नुकसान झाले.
Web Title: Sangamner Accident the cargo container overturned under the bridge