Crime News: शाळकरी विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचे कडक फोटो काढत मॉर्फ करून अश्लील फोटो व्हायरल
अहमदनगर | Crime News: अहमदनगर येथील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करून समाज माध्यमात प्रसारित करण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल झाल्याने पोलिसांनी चौकशी केली असता हे कृत्य अल्पवयीन विद्यार्थानीच केला असल्याचा खुलासा झाला आहे. याप्रकरणी पोलीस तपास करीत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेत काही विद्यार्थ्यांनी एका शिक्षिकेचे फोटो मॉर्फ करत त्याचे रुपांतर अश्लील फोटोत केले. त्या विद्यार्थ्यांनी हे फोटो इन्स्टाग्राम वर प्रसारित केले.
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
दरम्यान याप्रकरणी पिडीत शिक्षिकेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यातून तपासात सबंधित कृत्य करणारे हे ओळखीचेच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Crime News Pornographic photos go viral by school boys taking strict photos of the teacher