संगमनेर तालुक्यातील ही ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र, सध्या इतके रुग्ण संक्रमित
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील ३१ गावांमध्ये प्रशासनाला प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करावे लागले आहे.
संगमनेर तालुक्यात आत्तापर्यंत ३२ हजार ३२९ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यांमधील ३१ हजार ३४७ रुग्ण बरे झाले आहे. सध्या ८७९ रुग्ण कोरोना संक्रमित आहे. तर काल शुक्रवारी १५७ रुग्ण नव्याने आढळून आले आहेत.
तालुक्यात खळी, पिंप्री लौकी आजमपूर, जाखुरी, पानोडी येथील हजारवाडी, राजवाडा, टेकेवाडी, ढोणे वस्ती, तळेगाव दिघे येथील भागवत वाडी, मनोली, घुलेवाडी येथील श्रीराम कॉलनी, कनोली, शेडगाव, पिंपरणे येथील राहिंज वस्ती, निमगाव बुद्रुक गावठाण, निमगाव जाळी, आश्वी खुर्द मातंग वस्ती, राजापूर, सायाखींडी, ननवरे वस्ती व खळी वाडग, गुंजाळवाडी दोन कुटुंब वस्ती, चिकणी वर्पे वस्ती, आश्वी बुद्रुक, खांडगाव , वडगाव लांडगा, मांडवे बुद्रुक, चंदनापुरी, कोल्हेवाडी, चिंचपूर बुद्रुक, निमोण, मेंढवन, मालुन्जे, पेमगिरी ही गावे १४ दिवस प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे.
Web Title: 31 villages in Sangamner taluka are restricted areas