Home संगमनेर संगमनेरातुन एक  युवकाची तीन जिल्ह्यांतुन हद्दपारी

संगमनेरातुन एक  युवकाची तीन जिल्ह्यांतुन हद्दपारी

संगमनेरातुन एक  युवकाची तीन जिल्ह्यांतुन हद्दपारी

संगमनेर: – संगमनेर पोलीस ठाण्याअंतर्गत विविध गंभीर गुन्हयांबाबत प्रविण कासार यास तीन  जिल्ह्यांतुन हद्दपारी करण्याची घटना प्रांताधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथील प्रविण विष्णु कासार यांच्याविरुध्द संगमनेर शहर, तालुका पोलीस स्टेश्ननअंतर्गत भारतीय दंड संहिता ३०७, ३७९, ३५३, १४८, , १४९, ३२३, सन २०१६ मधील गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर २०१८ भारतीय दंड संहिता ३२६,३२३,३४१,५०४,५०६ असे गुन्हे दाखल आहे. तर काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

गणपतीच्या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन त्याला हद्दपार करण्यात येत आहे. तसेच येणारे सण, उत्सव बघता संगमनेर उपविभागात अबाधीत राहावी, कोणत्याही उत्सवास गालबोट लागु नये म्हणुन संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी अशोक थोरात ८ हद्दपारीचे प्रस्ताव त्यांच्याकडे शहर पोलीस स्टेशनकडुन कारवाईसाठी प्राप्त झाले आहेत.  शहरातील दोन टोळयांचे प्रस्ताव थेट पोलीस अधिक्षक यांना पाठविले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांनी दिली.

हद्दपारीच्या प्रस्तावामुळे आता विघ्नसंतोक्षी व सतत गुन्हे करणाऱ्यांचे धावे दणाणले आहेत. तर संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील अमोल उर्फ हरिभाऊ बाळसाहेब रणमाळे (लोहारे), कैलास आप्पा पवार (कोकणगाव),आप्पासाहेब संपत शिरसाठ(कोकणगाव), सखुबाई लहाने सुर्यवंशी (निमज),राहुल रामनाथ चकोर (पिंपळे), संजय मुरलीधर आंधळे (धांदरफळ), जाकीर जमाल शेख (जोर्वे), सुखदेव बाळाजी बत्तर (खात्रज दुमाला),एकनाथ कृष्णा शिरतार(पेमगिरी), दत्तु सुखदेव सानप (तिगाव), पाराजी कुशाबा दिघे (तळेगाव) व सुनिल झुंबर भडांगे (कौठे कमळेश्वर) या १२ जणांना १४४ (२प्रमाणे) २३ तारखेपर्यंत तडीपार केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी दिली.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद.  मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.


ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here