महापारेषणचा खांब अंगावर पडल्याने तरुणाचा मृत्यू
जामखेड | Accident:महापारेषणचा खांब अंगावर पडल्याने आनंद प्रभाकर हुलगडे वय २५ रा, चुंबळी ता. जामखेड या तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गणपती आगमनाच्या दिवशी तालुक्यातील चुंबळी गावात घडली.
जामखेडपासून ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद हद्दीतील चुंबळी येथील शिवारातून जाणारी महापारेषणची टावर विद्युत वाहिनी आहे.
आष्टी १३२ केव्ही ते खर्डा १३२ केव्ही जोडणारी वीज वाहिनी आनंद हुलगडे यांच्या शेतातून जाते. मात्र महापारेषणने हुलगडे यांना ठरल्याप्रमाणे कराराप्रमाणे पैसे दिले नाहीत असे काही ग्रामस्थांचे म्हणने आहे. त्यामुळे आमच्या शेतात तो टावर नको असे हुलगडे म्हणत होते. रात्रीच्या वेळी रात्री दोन ते अडीचच्या सुमारास टावरमधील काही खांब त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. गेल्या वर्षीच त्यांचे लग्न झाले होते.
दरम्यान प्रभाकर हुलगडे यांना पिकाचे नुकसान म्हणून तीन लाख सहा हजार रुपयांचा धनादेश दिलेला आहे. आमचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र रात्रीच्या वेळी आनंद यांनी टावरचे सपोर्ट कापल्यामुळे टावर एका बाजूला कलला होता. तो हुलगडे यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
– संतोष चव्हाण कार्यकारी अभियंता, महापारेषण
Web Title: Accident Young man dies after falling on pole