27 गुन्हे नावावर असलेल्या सराईत गुन्हेगार अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर| Ahmednagar News : महामार्गावर वाहने अडवून लुटमार करणाऱ्या टोळीचा प्रमुख सराईत गुन्हेगाराला पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. सागर भांड असे या आरोपीचे नाव आहे. त्याला पुणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे.
ऑगस्ट महिन्यात दिलीप देवराम तमनर हे घरी जात असताना त्यांना अनोळखी इसमाने कोयत्याचा धाक दाखवून लूटमार केली होती. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल, बॅग आणि मोटार सायकल असा एकूण 30 हजाराचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. याच आरोपीवर आतापर्यंत तब्बल 27 गुन्हे दाखल आहेत.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तसेच त्यापूर्वीही वाहन चालकांना अडवून लुटमार करण्याच्या घटना घडलेल्या असल्याने मा. पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरील नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणून नितीन मच्छिन्द्र माळी, वय 22 वर्षे, रा. मोरे चिंचोरे, ता. राहूरी, गणेश रोहीदास माळी, वय २१ वर्षे, रा. खडकवाडी, मूळा डॅम जवळ, ता. राहूरी, रवि पोपट लोंढे, वय 22 वर्षे, रा. घोडेगाव, ता. नेवासा, निलेश संजय शिंदे, वय 21 वर्षे, रा. पारिजात चौक, पाईपलाईन रोड, अहमदनगर, रमेश संजय शिंदे, वय- 20 वर्षे, रा. बारागाव नांदूर, ता. राहूरी व एक अल्पवयीन साथीदार यांना यापूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेवून राहूरी पोलिस स्टेशन येथे हजर केलेले आहे.
पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली कि आरोपी सागर भांड हा रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे येथे भाड्याने खोली घेवून रहात आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने. तिथे जाऊन त्याला अटक केली आहे.
Web Title: Ahmednagar News police arrested 27 criminals