Accident: संगमनेर तालुक्यात पुलावर दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणारा टेम्पो उलटला
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील कासारे येथील लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावरील पुलावर दुग्धजन्य पदार्थ घेऊन जाणारा टेम्पो उलटून अपघात झाल्याची घटना मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात सुदैवाने दोघे जण बचावले आहेत.
याबाबत माहिती अशी कि, मंगळवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास कासारे शिवारातील पुलावर समोरून आलेल्या अल्टो कारने कट मारल्याने हा अपघात घडला.
येथे पहा: हार्दिक पांड्या टॉप सिक्सेस, हेलिकॉप्टर शॉट 6666
तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्याने दुध पिशव्या व दही, श्रीखंड, पनीर असे दुघ्दाजन्य पदार्थ असलेला टेम्पो चालक विजय बबन जाधव रा. फलटण व सुपरवायझर सोमनाथ ठगे हे दोघेजण नगरकडून नाशिकच्या दिशेने जात असताना कासारे शिवारातील पुलावरून समोरून आलेल्या अल्टो कारने कट मारल्याने सदर टेम्पो उलटल्याची घटना घडली अशी माहिती चालक जाधव यांनी दिली. सुदैवाने या अपघतात चालक विजय जाधव व सोमनाथ ठगे हे बालंबाल वाचले आहेत.
Web Title: Sangamner Kasare Road tempo Accident