Home Accident News Accident: संगमनेर तालुक्यात आयशर ट्रक पलटी, एक जण जखमी

Accident: संगमनेर तालुक्यात आयशर ट्रक पलटी, एक जण जखमी

Sangamner Accident Ayshar truck turnover

संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे ते भागवतवाडी दरम्यान रस्त्यावर प्लावूड घेऊन जाणारा आयशर ट्रक पलटी झाल्याची घटना सोमवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास तळेगाव दिघे शिवारातील हाडोळा वस्तीजवळ घडली.

या अपघातात क्लिनरचा पाय मोडल्याने गंभीर जखमी झाला आहे. गणेश नेमचंद राजपूत असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर चालक मनोज राजपूत या अपघात बालंबाल बचावले आहे.

येथे पहा: हार्दिक पांड्याची बॅटिंग १ ओव्हर ६ ६ ६ ६ ४ १, हेलिकॉप्टर शॉट

तळेगाव दिघेमार्गे असलेल्या संगमनेर ते कोपरगाव रस्त्याने आयशर ट्रक प्लावूड घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास करीत होता. आयशर ट्रक तळेगाव दिघे शिवारातील हाडोळा वस्तीजवळ आला असता पलटी झाला. या अपघातात क्लिनरचा पाय मोडला तर चालक थोडक्यात बचावला आहे. जखमी झालेल्या गणेश राजपूत यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदत कार्य केले. सदर रस्ता हा खड्डेमय झाल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडत आहे.  

Web Title: Sangamner Accident Ayshar truck turnover

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here