HSC RESULT 2021: अहमदनगर जिल्ह्याचा 12 वी चा निकाल इतके टक्के लागला
HSC RESULT 2021 | अहमदनगर: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता 12 वीचा निकाल ऑनलाईन आज दुपारी जाहीर झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात 61 हजार 921 बारावीच्या विद्यार्थ्यांपैकी 61 हजार 787 विद्यार्थी पास झाले आहेत. तर 134 विद्यार्थी नापास झाले आहे. जिल्ह्यातील एकूण निकाल हा 99.78 टक्के इतका लागला आहे.
जिल्ह्यात कर्जत तालुक्यात 100 टक्के निकाल तर सर्वात कमी हा जामखेड तालुक्यातील 98.81 इतके टक्के लागला आहे. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये 134 विद्यार्थी नापास झाले आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. बारावीचे अंतर्गत मूल्यमापन तसेच दहावी आणि अकरावीच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. जिल्ह्यातील १२ वीच्या निकालात डिस्टींनमध्ये 30 हजार 522, ग्रेड एकमध्ये 25 हजार 687, ग्रेड दोनमध्ये 5 हजार 393 आणि पास प्रवर्गात 183 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
Web Title: Hsc Result 2021 Ahmednagar District