Murder Case: शिर्डी येथे खून केलेला फरार आरोपी जेरबंद
शिर्डी | Murder Case: शिर्डी येथे २९ जून रोजी मजुराचा खून करून फरार झालेल्या तिघा आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मालेगाव येथून अटक करण्यात आली आहे.
साहिल गुलशन पठाण वय १८, वारसी गयासद्धीन रजा शेख वय १८ व हसीम हारून खान वय २० रा. सर्व नाशिक अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिर्डी येथे राजेंद्र आंतवन धीवर या मजुराचा खून झाला होता. याअगोदर राजू सुभाष उबाळे, अविनाश प्रल्हाद सावंत, अमोल लोंढे व अरविंद महादेव सोनवणे या चार आरोपींना अटक केली होती. या गुन्ह्यातील तीन आरोपी पसार होते. हे आरोपी मालेगाव येथे लपून बसल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. सहायक निरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
Web Title: accused arrested in Shirdi murder