Home अहमदनगर विवाह सोहळ्यांत वऱ्हाडी मंडळी ४३ जण पॉझिटिव्ह

विवाह सोहळ्यांत वऱ्हाडी मंडळी ४३ जण पॉझिटिव्ह

Ahmednagar News 43 bridesmaids in marriage ceremony positive

पारनेर | Ahmednagar News: पारनेर तालुक्यात कोरोना संसर्ग चिंता थेट मुख्यमंत्र्यांना असताना तालुक्याच्या तहसीलदार यांनी रविवारी कोरोना साखळी तोडण्यासाठी लग्नसमारंभ आणि त्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीवर लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात काल १३ ठिकाणी लग्न समारंभ व साखरपुडा या ठिकाणी जमलेल्या वऱ्हाडी ३ हजार ६०० लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. यामध्ये ४३ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. अशा सामुहिकपणे लग्न सोहळ्यात वऱ्हाडी मंडळीची कोरोना चाचणी पहिला प्रयोग जिल्ह्यात तहसीलदार ज्योती देवरे यांनी राबविला आहे.

करोना बाधीतांचा आकडा वाढताना दिसत आहे. यामुळे तहसीलदार देवरे यांनी दोन दिवसापूर्वी तालुक्यातील 71 गावे संवेदनशील घोषित करण्यात आले असून तेथे संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश काढले. काल मोठी लग्नतिथी असल्याने मोठ्या संख्याने एकत्र येतील आणि एकमेंकांचा संपर्क वाढून संसर्ग वाढण्याची भीती होती.

लग्न संयोजकांना महसूल विभागाने सक्त ताकीत देत विवाह सोहळ्याला ५० पेक्षा जास्त नागरिक दिसले तर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला होता.  तसेच तालुक्यातील प्रत्येक कार्यक्रम स्थळी मंगल कार्यालय या ठिकाणी करोना चाचणी कॅम्प लावण्याचे आदेश दिले.त्यानुसार कार्यवाही करण्यात आली.

Web Title: Ahmednagar News 43 bridesmaids in marriage ceremony positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here