कौटुंबिक कलहातुन अख्खे कुटुंबच संपविले !
कौटुंबिक कलहातुन अख्खे कुटुंबच संपविले !
पत्नी, दोन चिमुकल्यांची हत्या करुन पित्याने घेतला गळफास
फुलंब्री : – कौटुंबिक कलहातुन पत्नी, दोन चिमुकल्यांची हत्या करुन पित्याने स्व:ताहा गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दि.(३१) सकाळी ७ वाजता तालुक्यातील पिंप्री सताळा येथे उघडीस आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कृष्णा देवरे तात्याराव देवरे (३४), शिवकन्याकृष्णा देवरे (२८),सर्वदा (९), व हिंदवी (६)अशी मयतांची नावे आहेत.
You May Also Like: Suhana Khan age, Birthdate, Biography, height
कृष्णा हे लाईट फिटिंग व वेल्डिंगची कामे करत. पती पत्नीमध्ये मागील काही वर्षापासुन वाद होते. यामुळे मागील तीन वर्षापासुन शिवकन्या माहेरी बोदवड (ता. सिल्लोड ) येथे राहत असे या दरम्यान मोठी मुलगी पिंप्री येथे वडिलांकडेच होती. तर लहान मुलगी आईसोबत हेाती. यावर्षीच तिचा गावातील जि.प.च्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला होते. जुन-जुलै मध्ये नातेवाइकांनी दोघांमध्ये समझोता करुन समेट घडवला व शिवकन्याला माहेरी आणले. पण त्यानंतरही आधुनमधुन दोघांमध्ये भांडणे सुरुच होते. सतत भांडणामुळे कृष्णाच्या आईवडिलांनी दोघांना वेगळे केले होते. त्यामुळे शेजारीच असलेल्या दुसऱ्या घरातच ते राहत .गुरुवारी नेहमीप्रमाणे जेवण करुन सर्वजण झोपी गेले. तत्पुर्वी या दोघां पती-पत्नींत काहीतरी कारणांवरुन भांडण झालले होते. याचा आवाज कृष्णाचे आईवडिलांना व इतर सदस्यांना गेला. परंतु ते नेहमीचे भांडण असुन ते शांत होतील व झोपी जातील असे म्हणुन सर्वांनी याकडे दुर्लक्ष केले. परंतु इकडे कृष्णाच्या डोक्यात वेगळेच होते, मध्यरात्री त्यांनी दोन्ही मुलांना गळफास करुन त्यांची हत्या केले. त्यानंतर पत्नीच्या डोक्यात धारदार शत्र्याने वार करुन तिची हत्या केली. यानंतर त्याने स्वत: ही गळफास घेऊन आत्महत्या केली.
सकाळी उशीर झाला तरी त्यांच्या घरी आवाज झाला नव्हता, तसेच घरी कोणाचे आवाज येत नव्हता. तेंव्हा त्याच्या वडिलांनी दरवाजाच्या फटीतुन बघितले असता मुलगा छताला गळफास घेऊन लटकलेला असल्याचे दिसुन आले. तसेच त्याने पोलीस येईपर्यंत कोणी दरवाजा उघडु नये, अशी एक चिठ्ठी दरवाजाच्या बाहेरील बाजुस चिकटवुन ठेवली होती. यानंतर कृष्णाचा आईवडिलांनी याची माहिती गाववाल्यांना व पोलिसांना सांगितले. पोलीस आल्यानंतर दरवाजा तोडण्यात आला. यावेळी घरामध्ये अन्य देवाणघेवाणीची एक चिठ्ठी मिळुन आला. दोन्ही चिठ्ठी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. माहिती समाजताच वडोदबाजार ठाण्याच्या सपोनि अर्चना पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रेत उत्तरीय तपासणीसाठी वडोदबाजार येथील प्राथमिक आरोग्य केंदात हलविले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आरती सिंह , उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक आम्ले, गुन्हे शाखचे सुभाष भुजंग सपोनी. अर्चना पाटील श्वानपदक खुशी श्वानसह ए. ए. मिसार आदि पथकासह घटनास्थळी दाखल झाले. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घटनास्थळी भेट दिली. नंतर एकाच चित्तेवर चौघांवर अत्यसंस्कार शवविच्छेदानंतर हे मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर त्यांच्यावर सताळा पिंप्री येथे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एकाच चित्तेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.