हॉटेलमध्ये तरुणावर तलवार व चाकूने प्राणघातक हल्ला
अहमदनगर | Crime: जेवण करत असताना आरडाओरडा करू नका असे सांगितल्याने तिघा जणांना राग आल्याने तरुणावर चाकू व तलवारीने प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नेप्ती शिवारातील हॉटेल दर्पण येथे ११ जुलै रोजी सायंकाळी ४:०० वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी जखमी तरुण राहुल भाऊसाहेब आंग्रे वय २६ रा. केडगाव यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून रोहित राजू आल्हाट, दत्तू साळवे, व गौरव राजू आल्हाट सर्व रा. नीलक्रांती चौक नगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुल आंग्रे व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवण करीत होते तेव्हा तेथे बसलेले तिघे आरोपी आरडाओरडा करत होते. त्यांना आरडाओरडा करू नका असे सांगितल्याने आरोपींनी फिर्यादी व त्याच्या मित्रांवर हल्ला करत शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अधिक तपास उप निरीक्षक बोडके हे करीत आहे.
Web Title: Young man stabbed to death in hotel crime filed