Home अहमदनगर चोरट्याला नागरिकांनी पकडला पण पोलिसांच्या ताब्यातून पळाला

चोरट्याला नागरिकांनी पकडला पण पोलिसांच्या ताब्यातून पळाला

Crime News thief was caught by civilians but escaped from police custody

श्रीगोंदा | Crime News: श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील कान्हेरमळा येथे मंगळवारी मध्यरात्री किरण संजय गायकवाड यांच्या घरी अज्ञात चोरट्याला चोरी करून फरार होत असताना परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असता पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना आरोपीने चालत्या गाडीचे दार उघडून पळून गेला. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोळगाव शिवारातील कान्हेरमळा याठिकाणी किरण संजय गायकवाड यांच्या घरी मंगळवारी मध्यरात्री घराचा दरवाजा उघडून ३ हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बाळ्या तसेच २ हजार रोख रक्कम असे ५ हजाररुपये किमतीचा मुद्देमालाची चोरी करून फरार होत असताना त्यास परिसरातील नागरिकांच्या मदतीने पकडले. त्यानंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात माहिती कळविली. पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार प्रकाश बारवकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पकडलेल्या आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना रस्त्याने चालू वाहनाचा दरवाजा उघडून आरोपीने मुद्देमालासह पलायन केले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Crime News thief was caught by civilians but escaped from police custody

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here