शिर्डीत अज्ञात हल्लेखोरांनी केला बांधकाम मजुरावर खुनी हल्ला
शिर्डी | Shirdi: शिर्डीत वर्षीय बांधकाम मजुरावर चार अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार (Murder Attack) करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार या मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे कामकाज सुरु होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अंतवन धीवर वय रा. कालिकानगर शिर्डी येथील सेंटरिंगचे कामकाज करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. या व्यक्तीचे कोणाशीही वादविवाद नाही. मंगळवारी नेहमीप्रमाणे आपले काम उरकून संजय नामक जोडीदारासमवेत घरी पायी येत असताना नगर मनमाड महामार्गावर साकुरी शिवाजवळील अज्ञात चौघांनी त्यांच्याकडे माचीस मागण्याचा बहाणा करत धारदार शस्त्राने हल्ला चढविला. हल्लेखोर हल्ला करून तेथून पसार झाले. गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या धीवर यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
Web Title: Shirdi worker Murder Attack