संगमनेर: कारचा अपघात एक जण ठार
संगमनेर | Accident: संगमनेर तालुक्यातील माहुली येथे नाशिक पुणे महामार्गालगत उभ्या ट्रकला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार मधील एक जण जागीच ठार झाला तर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.
अरुण अनंतराव जोशी वय ५६ रा. गारखेडा औरंगाबाद असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, कार(एम.एच. २० डी.जे/२६९७) मधून चार जण पुण्याहून संगमनेरमार्गे औरंगाबाद येथे जात होते. माहुली जवळ येताच कार चालकाला कार नियंत्रित न झाल्याने पुढे असलेल्या ट्रकवर जाऊन धडक दिली. यामध्ये अरुण जोशी जागीच ठार झाले तर तिघे जण किरकोळ जखमी झाले आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. अरुण जोशी यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी घारगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास घारगाव पोलीस करीत आहे.
Web Title: Sangamner Car Accident one death