पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून महिलेने तरुणीला मारहाण
अहमदनगर | Ahmednagar News: नगर शहरात एका पत्नीला आपल्या पतीच्या प्रेमसंबधाबाबत चाहूल लागल्याने वाद झाल्याचे समोर आले आहे.
पतीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून एका महिलेने तरुणीला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना ११ जून रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहरातील सीना नदीच्या पुलाजवळ घडली.
याप्रकरणी मारहाण झालेल्या तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादीवरून अनोळखी महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे.
याबाबत माहिती अशी की, ११ जून रोजी एका महिलेने सीना नदीच्या पुलाजवळ रस्त्यात अडवून माझ्या पतीसोबत तुझे प्रेमसंबध आहे असे म्हणत तरुणीला हातातील वस्तूने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक गणेश चौधरी करीत आहे.
Web Title: Ahmednagar News Woman beats young woman on suspicion of having love affair