Home संगमनेर संगमनेरात खतांसाठी शेतकऱ्यांचा जीव धोक्यात

संगमनेरात खतांसाठी शेतकऱ्यांचा जीव धोक्यात

Farmers lives in danger in Sangamner for fertilizers

संगमनेर | Sangamner: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची कमतरता भासू नये यासाठी शेतकऱ्यांनी खत खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर मोठी गर्दी केली आहे. शेतकरी आपला जीव धोक्यात घालत मोठ्या रंगांत उभे राहून खत खरेदी करत आहे. यामुळे कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून सामाजिक अंतर पाळण्याचा फज्जा उडाला आहे, अगोदरच तालुक्यात बाधित संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने प्रशासनाने खत विक्रीचे नियोजन करून गर्दी आटोक्यात आणावी अन्यथा पुन्हा कोरोना उपाय योजनांचे नियोजन कोलमडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची तालुक्यात अनेकदा कमतरता भासत असल्यामुळे पाणी असूनही पिकांचे खताअभावी नुकसान झाले आहे. पिकांना वेळीच खते देण्यासाठी अडचणी निर्माण होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रात गर्दी केली आहे. सकाळपासूनच रांगा लागत आहे. त्यामुळे कोरोनाला आमंत्रण मिळण्याची शक्यता आहे. वेळीच या खत विक्रीचे नियोजन प्रशासनाने करावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Farmers lives in danger in Sangamner for fertilizers

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here