कोपरगाव | Rape : कोपरगाव तालुक्यातील घारी गावात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या घटनेने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घारी येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार तिचा शेजारी राहणारा निलेश राजेंद्र ठोंबरे या इसमाने फिर्यादीच्या घरात जाऊन वारंवार तिचा लैंगिक छळ करत बल्ताकार केला. तसेच तिच्या आई वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करून दमदाटी करत असे. परंतु हा प्रकार असह्य झाल्याने फिर्यादीने शेवटी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंद केली आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीस अटक करून विविध काल्मान्वे गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव हे करीत आहे.
Web Title: Kopargaon Frequent rape of a minor girl