Home अहमदनगर मास्क घालण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून ग्रामसेवकास शिवीगाळ व धमकी

मास्क घालण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून ग्रामसेवकास शिवीगाळ व धमकी

Shrirampur Beating a villager out of anger for advising 

श्रीरामपूर | Shrirampur: श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक समीर लालाभाई मणियार हे कोरोना काळातील कर्तव्य बजावत असताना गावातील आटवाडी भागातील राहणारे दोन तरुण विना मास्क फिरताना आढळून आले.

यावेळी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता त्यांना ग्रामसेवक मणियार यांनी त्या दोघांना नियमांचे पालन करून मास्क वापरण्याचा सल्ला दिला.

या सल्ल्याचा राग दोन तरुणाना अनावर झाल्याने ग्रामसेवक मणियार यांना शिवीगाळ करून धमकी देण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात ग्रामसेवक मणियार यांनी फिर्याद दिली असून त्यावरून पोलिसांनी सौरभ अशोक पवार व प्रशांत अशोक पवार रा. आटवाडी एकलहरे ता. श्रीरामपूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक घायवट हे करीत आहे.   

Web Title: Shrirampur Beating a villager out of anger for advising 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here