Home अहमदनगर तृप्ती देसाईनी आता वेगळ्याच कारणासाठी परमेश्वराला घातलं साकडं  

तृप्ती देसाईनी आता वेगळ्याच कारणासाठी परमेश्वराला घातलं साकडं  

Trupti Desai now pray to God

अहमदनगर: महिलांना मंदिर प्रवेश आणि महिलांच्या हक्काबाबत आंदोलने करणाऱ्या भूमाता ब्रिग्रेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी आता वेगळ्याच कारणासाठी परमेश्वराला साकडं घातलं आहे. सध्या महाराष्ट्रात संकटामागून संकट येत असून यातून राज्याला बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांना परमेश्वराने शक्ती द्यावी असे साकडं देसाई यांनी घातले आहे.

देसाईनी म्हंटले आहे की, मागील वर्षापासून महाराष्ट्रावर  कोरोना संकट, चक्रीवादळ, नैसर्गिक संकट यातून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सुरक्षित बाहेर काढत संकटमोचन म्हणून काम केले आहे. यावर्षीही कोरोनाच संकट, चक्रीवादळ अशी संकटे आली आहेत. अजून किती संकट येणार माहित नाही. परंतु आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राला पुन्हा एकदा सुरक्षित बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने शक्ती द्यावी हीच आमच्या नागरिकांच्या वतीने प्रार्थना आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केवळ मुख्यमंत्री पद म्हणून त्यांनी हे साकडं घातलं आहे. मुख्यमंत्र्याच्या कामाचे कौतुक करून त्यांनी परमेश्वराला साकडं घातलं आहे.

Web Title: Trupti Desai now pray to God

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here