अहमदनगर जिल्ह्यातील या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदाराला कोरोनाची लागण
अहमदनगर: अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढत आहे. या दरम्यान तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून विविध ठिकाणी जनतेची सेवा करत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
अकोले तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे(Kiran Lahamate) यांना कोरोनाची लागण झाली आहे अशी माहिती त्यांनी सोशियल मेडियाद्वारे दिली आहे. तसेच त्यांनी तालुक्यातील तमाम मायबाप जनतेने, कार्यकर्त्यांनी स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी म्हंटले आहे की,
माझी कोरोना रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्बेत उत्तम आहे.
ज्यांना तालुक्यात राजकारण करायचे आहे त्यांना करू द्यात. माझे विलगिकरण कक्षाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर मी सर्व प्रश्नांचे उत्तरे देईलच. तो पर्येंत तालुक्यातील तमाम मायबाप जनतेने, कार्यकर्त्यांनी स्वतःची व आपल्या कुटूंबाची काळजी घ्यावी..
आमदार डॉ. किरण लहामटे
Web Title: MLA Kiran Lahamate Corona positive