पत्र्याच्या शेडमध्ये सुरु होता कारखाना, पोलिसांनी धाड टाकताच मिळाले हे घबाड
श्रीगोंदा | Shrigonda: श्रीगोंदा तालुक्यात एका शेडमध्ये विना परवाना सॅनिटायझर बनविण्याच्या कारखान्यावर पोलिसांना छापा घातला आहे. या छाप्यात २ लाख १८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. कारखाना चालविणाऱ्यास अटक करण्यात आली आहे.
कोणतेही तांत्रिक ज्ञान आणि परवाना नसताना मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर तयार करून दवाखाने, दुकाने, कंपन्या येथे विक्रीस पाठविण्यात येत होते.
याप्रकरणी विकास गुलाब तिखे रा. काष्टी ता. श्रीगोंदा यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ताब्यात घेतलेल्या साहित्याची आणि तयार सॅनिटायझरची तज्ञांकडून तपासणी करण्यात येत आहे. श्रीगोंदा पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना या कारखान्याबाबत माहिती मिळाली असता त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. औषध निरीक्षक अशोक राठोड व पोलिसांनी छापा टाकला. विकास गुलाब तिखे हा कारखाना चालवित होता. ड्रममधील द्रव्याच्या मदतीने निळे डाय (कलर) पाणी व इतर सोलुशन मिक्स करून हँण्ड सॅनिटायझर तयार केले जात होते.
त्यांच्याकडून सॅनिटायझर बनविण्याचे साहित्य त्यामध्ये २०० लिटरचे प्रत्येकी ६ बॅरल, ३५ लिटरचे २० कॅन, ५ लिटरचे १०९ कॅन, चंचुपात्र, नरसाळे, गाळण, प्रत्येकी १० बॉटलचे तीन मोठे बॉक्स, वेगवेगळ्या फ्लेवरचार बॉटल, ५० मिलीच्या २५ स्प्रे बॉटल स्टीकर, बिल बुक असे २ लाख १८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
Web Title: Shrigonda factory was started in a leaf shed