Home क्राईम संगमनेरात दोन गटांत हाणामारी, २५ जणांवर गुन्हे दाखल

संगमनेरात दोन गटांत हाणामारी, २५ जणांवर गुन्हे दाखल

Fighting between two groups at Sangamner

संगमनेर | Sangamner: दशक्रिया विधीचा प्लेक्स व घरातील व्यक्ती कोरोना बाधित असल्याने गर्दी करून नका या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रार्रीवरून २५ जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरमधील एकलव्य नगरमध्ये रविवारी सायंकाळी ही घटना घडली.

योगेश सूर्यवंशी यांच्या आजीचा दशक्रिया विधीचा प्लेक्स रस्त्याच्या कडेला लावत असता याचा राग आल्याने व परिघा सूर्यवंशीळा तुमच्या घरात बाधित आढळल्याने गर्दी करू नका असे म्हणत दोन गटांत हाणामारी झाली. या हाणामारीत लोखंडी कट्टी व काठ्यांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत योगेश सूर्यवंशी व परिघा सूर्यवंशी हे दोघे जखमी झाले आहेत.

त्यानी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून अतुल मेघनाथ सूर्यवंशी, सिद्धार्थ संपत सूर्यवंशी, परीगा सहादू सूर्यवंशी, आकाश दिनकर माळी, मयूर दिनकर माळी, मेघनाथ सहादू सूर्यवंशी, विघ्नेश मेघनाथ सूर्यवंशी, संपत सहादू सूर्यवंशी, उजवाला संपत सूर्यवंशी, मथुरा सहादू सूर्यवंशी, पूनम नवनाथ माळी, आदित्य संपत सूर्यवंशी, मीना गणेश माळी, रूपा दिनकर माळी, अनिता दिनकर माळी, गणेश दशरथ माळी, योगेश मनोहर सूर्यवंशी, सागर मनोहर सूर्यवंशी, सचिन मनोहर सूर्यवंशी विनोद मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, उमेश मनोहर सूर्यवंशी, शिवानी योगेश सूर्यवंशी, शोभा मनोहर सूर्यवंशी, अरुणा मनोहर सूर्यवंशी, मनोहर बाबुराव सूर्यवंशी सर्व रा. एकलव्य नगर आदी २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Fighting between two groups at Sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here