Home अहमदनगर पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की, आरोपींना पाच दिवसांची कोठडी

पोलीस निरीक्षकास धक्काबुक्की, आरोपींना पाच दिवसांची कोठडी

Parner Pushing the police inspector

पारनेर | Parner: शहरातील भाजी बाजारात कारवाई करीत असणाऱ्या पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी व शिवीगाळ करण्यात आली. बुधवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष भगवंत कुलट वय ६०, सचिन सुभाष कुलट वय ३१, बाबाजी रामदास खोडदे वय ४० रा. सर्व जामगाव रस्ता पारनेर अशी आरोपींची नांवे आहेत.  

याबाबत पोलीस कर्मचारी सत्यजित शिंदे यांनी फिर्याद दिली. तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप व पारनेर पोलीस पथक शहरात गस्त घालत होते. लाल चौकात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करीत भाजी बाजार भरला होता. यावेळी भाजी विक्रेत्यांना ध्वनीक्षेपावर सूचना देण्यात आल्या. एका ठिकाणी बसून भाजी, फळे विकता येणार नाहीत त्यामुळे या ठिकाणी थांबून गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले. यावेळी इतर भाजीपाला विक्रेते निघून गेले. मात्र सुभाष कुलट व सचिन कुलट यांनी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. भाजी विकल्याशिवाय आपण येथून जाणार नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली. याच दारान्यता सुभाष कुलट यांनी बळप यांस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याने बळप यांच्या गणवेशावर लावलेली नेमप्लेट ओढून तोडून टाकली. इतर विक्रेत्यांना हटविणारे पोलीस कर्मचारी पोलीस निरीक्षक यांच्याकडे धावले. यावेळी त्यानी पोलीस कर्मचारी यांना धक्काबुकी केली. या तिघांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीत बसवत असताना आरोपी प्रतिकार करीत असताना दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या तीनही आरोपींना पारनेर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.    

Web Title: Parner Pushing the police inspector

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here